केस गळून गळून खूपच बारीक झाले? 'या' पद्धतीने हेड मसाज करा; १० दिवसांत वाढतील केस
१) ब्लड सर्क्युलेशन सुधारते
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशननुसार जेव्हा आपण स्काल्पवर समाज करतो तेव्हा केसांच्या मुळांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. स्काल्पमद्ये योग्य प्रमाणातत ऑक्सिजन आणि इतर पोषक तत्व पोहोचणं गरजेचं असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. २०१६ च्या एका रिसर्चनुसार हेड मसाज केल्याने केस दाट काळे होण्यास मदत होते. या अभ्यासात एकून ९ पुरूषांवर संशोधन करण्यात आले होते. त्यांनी जवळपास २४ आठवडे ४ मिनिटांपर्यंत हेड मसाज केली होती. त्यांच्या केसांची चांगली वाढ झाली होती.
२) ताण-तणाव कमी होतो
केस गळण्यासाठी ताण-तणाव जबाबदार असतो. हेड मसाज केल्याने स्ट्रेस लेव्हल कमी होण्यास मदत होते. हेड मसाजमुळे ब्लड फ्लो चांगला राहतो. ज्यामुळे हेअर लाईन, कानाच्या मागे आणि मांसपेशींचा तणाव कमी होण्यास मदत होते.
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांनी १५ ते २५ मिनिटं हेड मसाज केल्यास ताणतणावाचे हॉर्मोन्स, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
३) केसांची मसाज कशी करावी? (Right Way To do Head Massage)
जर तुम्हालाही केस वाढवायचे असतील तर हेअर मसाज करताना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. कोणत्याही तेलाने केसांची मसाज करू नका. केसांच्या लांबीनुसार योग्य तेलाची निवड करा. ऑलिव्ह ऑईल, कोकोनट ऑईल ही तेलं उत्तम ठरतात. केसांचे छोटे छोटे सेक्शन्स घेऊन मसाज सुरू करा.
सगळ्यात आधी मानेच्या मधल्या भागातून सुरूवात करा. तेल लावताना केसांच्या मुळांची मसाज करा. मसाज करताना प्रेशर यायला हवं. ज्यामुळे ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. जेव्हाही तुम्ही केसांची हेअर मसाज कराल तेव्हा १० मिनिटं करा. ज्यामुळे पूर्ण स्काल्प व्यवस्थित कव्हर होईल. केस धुण्यासाठी माईल्ड शॅम्पूचा वापर करा.
0 Comments