Ticker

6/recent/ticker-posts

23 राज्यांत यंदा होणार धो धो पाऊस

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह देशातील २३ राज्यांमध्ये दमदार पाऊस होणार आहे. तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी ते सामान्य प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने मंगळवारी वर्तविला आहे. 

Heavy Rain


९६ ते १०४ टक्क्यांदरम्यान झालेला पाऊस हा सामान्य किंवा सरासरी प्रमाणातील असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीस अल् निनोच्या कारणामुळे पावसाचे प्रमाण कमी असू शकते. मात्र नंतर हळूहळू पावसाचे प्रमाण सामान्य होईल, असे स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी सांगितले. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. 


उत्तम पाऊस शेतीसाठी वरदान

देशातील ७० ते ८० टक्के शेती ही पावसावरच अवलंबून आहे. चांगला पाऊस झाल्यास त्यामुळे शेतीशी संबंधित सर्वच गोष्टींचे उत्पन्न वाढते. त्यातून अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते. चांगला पाऊस झाला तर पाण्याचे प्रमाण वाढेल परिणामी वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. 


चार राज्यांत कमी पाऊस

बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस होईल. त्यानंतर सामान्य प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. 


स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हरयाणा, चंडीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, उत्तराखंड, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, पुदुचेरी, दादरा आणि नगर हवेली, दमण, दीव, लक्षद्वीपमध्ये भरपूर पाऊस पडेल.


मार्च सर्वात उष्ण

अल निनो आणि हवामान बदलामुळे यंदाचा मार्च हा आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरल्याचे युरोपियन युनियनच्या हवामानविषयक संस्थेने स्पष्ट केले. विशेष म्हणजे मागील जून महिन्यापासून मार्चपर्यंत सलग १० महिने विक्रमी तापमान राहिले आहे. मार्चचे सरासरी तापमान १८५० ते १९०० दरम्यानच्या तुलनेत १.६८ अंशाने अधिक

Post a Comment

0 Comments