Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पाऊस म्हणजे काय? अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, 'या' तारखेपर्यंत सुरू राहणार वादळी पाऊस !

अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, 'या' तारखेपर्यंत सुरू राहणार वादळी पाऊस !


अवकाळी पाऊस म्हणजे काय?

अवकाळी पाऊस म्हणजे पावसाळ्याचा काळ सोडून पडणारा पाऊस.

भारतात 1 जून ते 30 सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा काळ मानला जातो. दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सूनमुळे पाऊस पडतो.


अवकाळी पाऊस कशामुळे पडतो? याची वेगवेगळी कारणं असू शकतात. कधी एखाद्या मोठ्या वातवारणीय घडामोडीमुळे तर कधी स्थानिक पातळीवरील हवामानाच्या स्थितीमुळे पाऊस पडू शकतो.


अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, 'या' तारखेपर्यंत सुरू राहणार वादळी पाऊस !

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. एकीकडे तापमान नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस सुरु आहे. खरे तर, काल विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली. 



अशातच आता भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असल्याचे म्हटले आहे. आय एम डी ने आपल्या सुधारित हवामान अंदाजात शुक्रवार पर्यंत नव्हे तर शनिवार पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू राहणार असे जाहीर केले आहे.

यामुळे आधीच चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण भारतीय हवामान खात्याचा नवीन सुधारित हवामान अंदाज काय सांगतो, आय एम डी नि राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे, याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यात शनिवारी सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता आहे. म्हणजे वादळी पावसाचे सत्र आगामी काही दिवस सुरूच राहणार आहे. आज अर्थातच 10 एप्रिल, बुधवारी विदर्भ विभागातील बुलडाणा, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यात वादळी पावसाची आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात देखील पाऊस पडणार असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात सुद्धा काही भागात पाऊस पडू शकतो असे आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे उद्या 11 एप्रिल ला विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी पडणार अशी शक्यता वर्तवली आहे.


तसेच 12 आणि 13 तारखेला अर्थातच शुक्रवारी आणि शनिवारी राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे.

यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. खरेतर जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रात वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

आता रब्बी हंगामातील शेती पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे आणि अशातच आता पावसाचे सत्र सुरू झाले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार अशी भीती व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments