Ticker

6/recent/ticker-posts

शाळा सुरु केव्हा होणार? | 2024 मधील उन्हाळी सुट्टी व शैक्षणक वर्ष 2024-25 मधील शाळा सुरु करणेबाबत.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणक वर्ष 2024-25 मधील शाळा 15 जून पासून सुरु करणेबाबत.उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्रार्थामक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शेक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.


1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, दि.02 मे 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.


2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शेक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.


3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दि.15 जून, 2024 रोजी सुरु करण्यात याव्यात.


4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दि.01 जुलै, 2024 पासून सुरु करण्यात याव्यात.


वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.


शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणक वर्ष 2024-25 मधील शाळा 15 जून पासून सुरु करणेबाबत. शासन परिपत्रक

Post a Comment

0 Comments