Ticker

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे यांचे उपोषण यशस्वी | सरकारकडून या मागण्या मंजूर | तर आजच सोडणार मुंबई

उपोषण यशस्वी | सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्या मंजूर, शासन निर्णय निघाल्यास आजच सोडणार मुंबई

Image सोर्स TV9 मराठी


सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्या मंजूर

  • सरकार हैद्राबाद गॅजेट लागू करण्यासाठी तयार, हैद्राबाद गॅजेट तात्काळ लागू करणार 
  • राज्यपालाच्या सहीने तातडीने जीआर काढणार
  • सातारा गॅजेट एका महिन्यात लागू करणार
  • मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याचा जीआर काढणार
  • मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला एका आठवड्यात मदत देणार
  • 58 लाख कुणबी नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायत वर लावणार
  • सगे सोयऱ्यावर आठ लाख हरकती, वेळ लागणार


मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारचं उत्तर काय? 


1)  हैदराबाद गॅझेटियर लागू करा. 

सरकारचं उत्तर - हैद्राबाद गॅजेट लागू करण्याची मान्यता उपसमितीने दिली आहे. तात्काळ लागू करणार. जीआर काढणार


2)  सातारा संस्थान जीआर काढा - 

सरकारचं उत्तर - औंध आणि सातारामध्ये काही त्रुटी आहेत. १५ दिवसात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल. जीआर काढणार


3) मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या. 

सरकारचं उत्तर - सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेणार, शासन निर्णय जारी करणार. 

मराठा आरक्षण आंदोलनमध्ये बळी गेलेल्या कुटुंबियांना १५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्य परिवहन मंडळात नोकरी मिळेल. 

जर शिक्षण जास्त असेले तर सरकारी नोकरी द्यावी. 


4) आम्हाला कायद्यात बसणारे आरक्षण द्या. 

सरकारचं उत्तर - मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला. 

 

५) 58 लाख कुणबीच्या नोंदी ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना कळेल नोंदी मिळाल्या. 

आज २ तारीख आहे आता गेल्या गेल्या एक आदेश काढा प्रमाणपत्र अनेकांचे अडकले व्हॅलिडिटी मध्ये त्यावर निर्णय घ्या

उत्तर - जेवढे दाखले आले ते तातडीने द्या असा निर्णय आम्ही घेऊ. आता मनुष्यबळ त्याला दिलं आहे जलदगतीने काम होईल  


६) मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे

उत्तर - किचकट आहे त्याला वेळ लागेल 1  महिना लागेल 


७)  सगेसोयरेचा निर्णय घ्या म्हणालो

उत्तर - याला वेळ लागेल ८ लाख चुकीच्या नोंदी आहेत,  त्याबद्दल वेळ लागणार आहे 


8) ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या. सगेसोयरे पोट जात म्हणून घ्या. 

सरकारचं उत्तर - गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार

Post a Comment

0 Comments