Ticker

6/recent/ticker-posts

चारशेहून अधिक उमेदवार आल्यास बॅलेट पेपरवर मतदान !

मतदारसंघात ४०० हून अधिक उमेदवार आल्यास तेथे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर म्हणजेच मतदानपत्रिकेवर मतदान घेतले जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी शनिवारी दिली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी प्रत्येक मतदारसंघात ४०० हून अधिक उमेदवार देण्याची तयारी केली आहे. मात्र, ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून केवळ ४००च उमेदवारांचे मतदान घेता येत असल्याने त्याहून अधिक उमेदवार आल्यास काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. 

या पार्श्वभूमीवर चोकलिंगम म्हणाले की, अशी परिस्थिती आल्यास एक बुकलेटच तयार केले जाईल. बुकलेट मतपत्रिकेच्या माध्यमातून ४०० पेक्षा अधिक उमेदवारांच्या नावांचा आणि चिन्हाच्या आधारावर मतदारांकडून शिक्का मारून मतदान केले जाऊ शकते. त्यासाठी आयोग सज्ज आहे.

Post a Comment

0 Comments