Ticker

6/recent/ticker-posts

Taiwan earthquake | तैवानमध्ये 25 वर्षांतील सर्वांत शक्तिशाली भूकंप; तीव्रता 7.4 रिक्टर स्केल

तैवानमधील बुधवारची सकाळ उजाडली ती भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी. भूकंपाची तीव्रता सुमारे ७.४ रिक्टर स्केल इतकी नोंदवली गेली. सुमारे २५ वर्षांतील सर्वांत शक्तिशाली भूकंपामुळे तैवानमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला, तर ९३४ हून अधिक जखमी झाले. भूकंपात अनेक इमारतींची पडझड झाली असून त्यात अडकलेल्या नागरिकांची बचाव पथकाकडून सुटका करण्यात आली. भूकंपामुळे तैवान, जपान, फिलिपाईन्समध्ये त्सुनामीचा इशारा दिला होता; पण, नंतर तो मागे घेण्यात आला. भूकंपाची तीव्रता सुमारे ७.४ रिक्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियन प्रांतातील किनारपट्टीवर केंद्रित होता, भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती, की अनेक इमारती ४५ अंश कोनात कलल्या. राजधानी तैपेईमध्ये जुन्या इमारतींचे भाग कोसळले. शाळा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना मैदानांवर हलविले होते.

तैवानला नियमितपणे भूकंपाचा धक्का बसतो, त्यामुळे सुरक्षिततेसाठी जगातील सर्वांत प्रगत सुसज्ञ्जता आहे; परंतु, बुधवारच्या भूकंपामुळे येथील नागरिकही भयभीत झाले होते.


तैवान संसदेचेही झाले नुकसान

दुसऱ्या महायुद्धापूर्वी बांधलेल्या शाळेत असलेली राष्ट्रीय संसद आणि तैपेईच्या अगदी दक्षिणेकडील ताओयुआनमधील मुख्य विमानतळाचे किरकोळ नुकसान झाले. भूकंपानंतर भूस्खलन आणि बोगद्यांत दरडी कोसळून महामार्ग ठप्प झाले. या बेटावर रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली होती.


तैवानला लहान- मोठ्या भूकंपांची सवय आहे. मात्र, बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी जाणवलेला भूकंपाचा धक्का मोठा होता. खिडक्या जोरात हलल्या आणि बेड जोरजोरात हलू लागला. यामुळे झोप उडाली. उठून पाहतो तर मोठा भूकंप होत असल्याचे लक्षात आले अन् अंगावर काटा आला. असा भूकंप प्रथमच अनुभवत होतो.

६ वर्षांपासून तैवानमध्ये राहात असल्याने भूकंप ही येथे काही नवीन गोष्ट नाही. दर महिन्याला किमान ४ ते ५ रिक्टर स्केलचे अनेक धक्के बसत असतात. मात्र, बुधवारी सकाळी जेव्हा उठलो तेव्हा जे हादरे बसत होते तेव्हा ते प्रचंड होते. काही क्षण काय करायचे तेच कळाले नाही. सकाळी ८ ते दुपारपर्यंत अनेक लहान-मोठे धक्के जाणवत होते.जुन्या इमारतीच कोसळल्या...

मी २४ व्या मजल्यावर राहात असल्याने घाबरलो होतो. मात्र, सोसायटीने तत्काळ अलार्म वाजवून आम्हाला न घाबरण्याचे आवाहन केले. पायऱ्यांनी खाली येण्यास सांगितले.

इतक्या मोठ्या रिक्टर स्केलचा भूकंप होऊनही येथे अधिक नुकसान झालेले नाही. जुन्या इमारतींचे नुकसान झाले आहे. राजधानीत तर एकाही इमारतीचे नुकसान झालेले नाही.

Post a Comment

0 Comments