महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीए आघाडीचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. c p radhakrishnan vice president
जगदीप धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर उप राष्ट्रपतीपदी नक्की कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु आज झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. विरोधी आघाडीचे उमेदवार डी सुदर्शन रेड्डी यांच्या सोबत झालेल्या लढतीमध्ये सीपी राधाकृष्ण यांना 452 तर विरोधी आघाडीच्या उमेदवाराला 300 मते मिळाली असून 13 खासदारांनी मतदान केले नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान आज 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर लगेचच मतमोजणी ही करण्यात आली.
राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ९८.२ टक्के मतदान झाले. एकूण ७८८ मतदारांपैकी ७ जागा रिक्त होत्या, त्यामुळे ७८१ मतदार पात्र होते. यापैकी ७६७ खासदारांनी मतदान केले, त्यातील ७५२ मते वैध ठरली, तर १५ मते अवैध ठरली.
राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांची या निवडणुकीसाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारत राष्ट्र समिती (४ राज्यसभा खासदार), बीजू जनता दल (७ राज्यसभा खासदार) आणि शिरोमणी अकाली दल (१ लोकसभा आणि २ राज्यसभा खासदार) यांनी मतदानात भाग घेतला नाही.
या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेचे 788 खासदार मतदान करण्यास पात्र असतात परंतु यापैकी सात जागा रिक्त असल्याने 781 मतदान होणे आवश्यक होते परंतु 13 मते पडलेली नसल्यामुळे मतमोजणीचा निकाल जाहीर करताना बेरजेमध्ये तेवढा फरक पडत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच प्रमुख राजकीय नेत्यांनी सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments