Ticker

6/recent/ticker-posts

उल्लास-नवभारत साक्षरता अभियान - निरक्षरांची होणार परीक्षा

केंद्र सरकारच्या उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यभरात ६ लाख २० हजार निरक्षरांची नोंद झाली असून, त्यापैकी पाच लाख निरक्षर येत्या १७ मार्चला परीक्षेला सामोरे जाणार आहेत. सध्या दहावी बारावीच्या परीक्षांसह इतरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे या परीक्षेच्या निमित्ताने नातवंडांसह आजी - आजोबाही अभ्यासात सध्या मग्न आहेत.



१५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्यात महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करण्याचे आव्हान या योजनेंतर्गत पेलायचे आहे.


कशी असेल परीक्षा

या कौशल्यांमध्ये आर्थिक, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन, शिक्षण आणि कुटुंब कल्याण इत्यादी बाबींचा समावेश आहे.

या कार्यक्रमात उल्लास अॅपवर निरक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ मार्चला सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत परीक्षा केंद्रांवर जाऊन ही पायाभूत चाचणी परीक्षा द्यावयाची आहे.

उल्लास अॅपवरील नोंदणीकृत निरक्षर व्यक्तीच परीक्षा देण्यास पात्र असेल, उत्तर पत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किवा निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाच्या शाईचा पैन वापरू नये, अशी सूचना योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी परीक्षार्थीना केली आहे.

Post a Comment

0 Comments